‘वाझे अंबानींकडून हप्ते वसुलीसाठी प्रयत्न करत होता’, भाजप आमदाराचा दावा
![Sachin Waze's bail application rejected by NIA court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sachin-Vaze.jpg)
मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने अटक केल्यानंतर आता अनेक माहिती समोर येऊ लागली आहे. एनआयएकडून काही गाड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत, तसेच यात काही मोठे पुराव देखील हाती लागले आहेत.
भाजपकडून सुरुवातीला सचिन वाझेंवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेने मात्र त्यांची पाठराखण केली होती. मात्र आता वाझेंना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकारकडून प्रतिष्ठा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यातच आता भाजपचे आमदार राम सातपुते यांनी थेट वाझे हे मुकेश अंबानींकडून हप्ता वसुलीसाठी प्रयत्न करत होता, असा दावा केला आहे.
राम सातपुते यांनी ट्विट करत दावा केला आहे की, विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे हाच गुन्हेगार म्हटल्यावर सत्ताधाऱ्याला त्रास झाला होता. पण सेनेचा हा माजी शिवसैनिक वाझे अंबानींकडेच हप्तावसुली साठी विशेष प्रयत्न करत होता हे सिद्ध होत आहे.
फेरीवाले ते अंबानी हप्तावसुली ही प्रगती हेच ठाकरे सरकारच खर यश आहे, असा टोला देखील राम सातपुते यांनी लगावला.