breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Waragainstcorona: काळेवाडीतील विद्यार्थ्यांचा संवेदनशीलता; शिष्यवृत्तीची १० हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे संपूर्ण देशात आर्थिक संकट उभे राहिले आहे. पीएम फंड, सीएम फंडासाठी राज्यातील तळागाळातील नागरिक मदत करीत आहेत. विशेष म्हणजे, काळेवाडीतील एका इ.११ वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थ्यानेही संवेदनशीलता दाखवत शिष्यवृत्तीत मिळालेली १० हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे.

          काळेवाडी येथील चि. यशराज विलास नढे याने त्याला इ.10 वी ला मिळालेली शिष्यवृत्तीची संपुर्ण रक्कम रू. १००००/- (दहा हजार) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत म्हणून दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी इ.10 वी मधील गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. यशराज याचाही रक्कम रु.10000/- ( दहा हजार )देऊन सन्मान केला होता. सध्या कोरोनाने देशात व राज्यात धुमाकूळ घातला आहे. सदर आजाराचा राज्य सरकार सामना करत आहे त्यासाठी हातभार म्हणून यशराज याने त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची संपुर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. यशराज याच्या संवेदनशीलपणाचे कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button