breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#War Against Corona : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे वाचन करुन घरातच जयंती साजरी करा : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन १४ एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला. बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण दिली. त्यांची ही शिकवण डोळ्यांसमोर ठेवून १४ एप्रिलला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन आपण घराघरात करूया व त्यांचे स्मरण करूया, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, यावेळी घरातच आपण हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा करूया. केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला सहकार्य करुन बाहेर न जाता घरातच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करुया, अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button