दोन दिवसांपूर्वी शेतकर्यांना सुनावलं, नंतर दिलगिरी; आज पुन्हा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे बळीराजाच्या बांधावर

Manikrao Kokate : कर्जमाफीच्या मुद्यांवर बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषीमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही, असेही कोकाटे यांनी म्हटलंय.
नाशिक येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी बोलताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफीच्या मुद्यांवर बोलताना भाष्य करत खडे बोल सुनावले होते. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा नाशिकच्या अवकाळी आणि गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बागलान, सटाणा परिसरात जाऊन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पाहणी करणार आहेत. या परिसरात दोन दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. ज्यामुळे कांदा, डाळ, टोमॅटो, गहू आणि भाजीपाला पिकाचं मोठे नुकसान झाला आहे. जिल्ह्यात जवळपास 4500 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या अवकाळीमुळे सर्वाधिक फटका हा कांदा पिकाला बसला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या माडसांगवी परिसरातील द्राक्ष बागांचा झालेल्या नुकसानाची पाहणी माणिकराव कोकाटे यांनी केली होती. याच दौऱ्या दरम्यान कर्ज माफीबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अशातच आता कृषीमंत्री पुन्हा एकदा शेतकर्यांच्या बांधावर जात आहेत.
हेही वाचा – एकत्रित निवडणुका 2029 मध्ये होणार नाहीत; निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट
नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
नाशिक येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी बोलताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफीच्या मुद्यांवर बोलताना भाष्य करत खडे बोल सुनावले होते.
यावेळी ते म्हणाले होते की, जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही असे मामिकराव कोकाटे म्हणाले. तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय, करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.