breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आज सेन्सेक्समध्ये 187, तर निफ्टीमध्ये 53 अंकांची वाढ

मुंबई | टीम ऑनलाइन
कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज सकाळपासून मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार किंचिंत वाढीसह बंद झाला. आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. सेन्सेक्स 57,799 वर उघडला आणि बंद होईपर्यंत 800 हून अधिक अंकांनी सावरला. तर निफ्टी मध्येही असेच काहीसे दिसून आले. सकाळी जेवढी घसरण झाली, तेवढी बाजार बंद होईपर्यंत रिकव्हर झाली.

आज सेन्सेक्स 57808.58 अंकांवर बंद झाला. यात 187.39 अंकांची किंवा 0.33 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी 17266.80 वर बंद झाला. यात 53.20 अंकांची किंवा 0.31 टक्क्यांची वाढ झाली.

तसेच मेटल आणि PSU बँकांमध्ये अनुक्रमे 0.80 टक्के आणि 0.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. एनर्जी, रिऍल्टी आणि आयटी क्षेत्र लाल रंगात बंद झाले. यामध्ये अनुक्रमे 1.31 टक्के, 0.84 टक्के ​​आणि 0.29 टक्क्यांची घट नोंदवली गेली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button