breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स हजार अंकांनी कोसळला

 

मुंबई | प्रतिनिधी 

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारही आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या घसरणीसह उघडला. सेन्सेक्स ५२९ अंकांनी घसरून ५५३२९ वर, तर निफ्टी १७६ अंकांनी घसरून १६४८१ अंकांवर सुरू झाला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १००९ अंकांनी कोसळला, तर निफ्टीत २४६ अंकांची घसरण झाली होती. या पडझडीत गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झाले.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकातील ३० कंपन्यांपैकी २७ शेअर्समध्ये घसरण झाली असून ३ शेअर्स वधारले. सर्वात मोठी घसरण एचडीएफसी बँकेत दिसून येत आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये २.५० टक्क्यांची घसरण झाली असून ते सध्या १४१९ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर, शेअर बाजारात मेटल सेक्टर वगळता सर्वच सेक्टरमधील शेअर्स घसरले आहेत. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री होत आहे. ऑटो, आयटी, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभागही घसरले आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button