ताज्या घडामोडीमुंबई
निराधार ज्येष्ठांसाठी राज्य सरकार आरेमध्ये ‘मातोश्री’ वृद्धाश्रम बांधणार
मुंबई | निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत आरे वसाहतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
कौटुंबिक कलह, जागेचा प्रश्न अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या निवार्यापासून वंचित केले जाते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा व पालनपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार मातोश्री वृद्धाश्रम योजना राबवते. मात्र मुंबई उपनगरात सरकारचा असा एकही वृद्धाश्रम नाही. त्यामुळे आरे वसाहतीत मातोश्री वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.