Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मेट्रो 3 कारशेडसाठी प्रस्तावित असलेली कांजूरमार्ग येथील जागा केंद्राची नाही – उच्च न्यायालय
![The site at Kanjurmarg proposed for Metro 3 car shed does not belong to the Center - High Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/kanjurmarg-carshed-11.jpg)
मुंबई – बहुचर्चित मेट्रो 3 च्या कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कंजूरमार्ग येथील जागेवर केंद्राने दावा केला होता. मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला आहे.कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो-३’च्या कारशेड प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागेवर केंद्र सरकार वा खासगी व्यावसायिक हक्क सांगत असले, तरी त्यांच्या दाव्यात तथ्य नाही. त्यांच्या मालकी हक्काच्या दाव्याला गुणवत्ता वा कागदपत्रांचा आधार नाही, असा दावा हस्तक्षेप याचिकेद्वारे शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.