TOP Newsताज्या घडामोडीमुंबई
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील म्युनिसिपल मजदूर युनियनने ठिय्या आंदोलन
![The Municipal Mazdoor Union of the Tuberculosis Hospital in Shivdi held a protest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/nurse.jpg)
मुंबई : कामगारांच्या व परिचारिकांच्या विविध मागण्या अद्याप मान्य न झाल्यामुळे शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील म्युनिसिपल मजदूर युनियनने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्या, सोमवारपासून हे आंदोलन सुरू होईल, असा इशारा देण्यात आला.
के. ई. एम, नायर, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय या महापालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयांतील परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना महिन्याला आठ साप्ताहिक सुट्टी दिल्या जातात. याच धर्तीवर महापालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील परिचारिकांनाही साप्ताहिक सुट्टय़ा दिल्या जाव्यात, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.