ताज्या घडामोडीमुंबई

वाइन विक्रीच्या निर्णयावर सरकार हरकती, सूचना मागवणार

मुंबई | राज्यातील मोठय़ा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. लोकांकडून या निर्णयावर हरकती व सूचना मागवण्यात येणार असून त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सांगितले. तसेच हजारे यांना उपोषण न करण्याची विनंतीही केली.वाईन विक्रीला विरोध म्हणून अण्णा हजारे यांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारतर्फे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने वल्सा नायर यांनी निर्णय प्रक्रियेबाबत हजारे यांना माहिती दिली.नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्यासह इतर काही यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button