ताज्या घडामोडीमुंबई

शेअर बाजारात अस्थिरता कायम; सेन्सेक्स ७५८ तर निफ्टी २५२ अंकांनी घसरले

मुंबई|गेल्या नऊ दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने कोसळत असून आज सेन्सेक्स ७६८ अंकांनी घसरला. तर, शेअर बाजार बंद होताना निफ्टीही २५२ अंकांनी घसरला आहे.

सर्वच क्षेत्रात आज जवळपास २ ते ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. Titan Company, Maruti Suzuki, Asian Paints, Hero MotoCorp आणि Tata Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Dr Reddy’s Laboratories, ITC, Tech Mahindra, Sun Pharma आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर, 96 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

शेअर बाजाराची सुरुवातच ८०० हून अधिक अंकांच्या घसरणीने झाली. त्यामुळे निर्देशांक ५५ हजारांखाली आला होता. तर निफ्टी देखील 238 अंकांनी कोसळला होता. दरम्यान, रशियाने युरोपच्या सर्वात मोठ्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचा ताबा घेतल्याचा परिणाम युरोपच्या शेअर बाजारावर झाला असून त्यामध्येही मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button