‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ निर्माण करणारी कंपनी मालवणमध्ये उभारणार शिवरायांचा पुतळा
पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी
!['Statue of Unity', Company, Malvan, Shivaraya, Statue, Rs 31.75 crore, funds, approval,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/shivaji-780x470.jpg)
मुंबई : मालवण येथील राजकोट येथे गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा हा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ (Statue of Unity) हा भव्य पुतळा उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे.
या पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. हा ६० फूट उंचीचा पुतळा ब्रॉन्झमध्ये तयार करण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा – विद्यार्थी खेळाडूंचे प्रस्ताव राज्य बोर्डाने मागवले
पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा मत्स्य विकास मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी घेतला. पुतळा उभारणीमध्ये हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुतळ्याची सर्व कामे व्यवस्थित व्हावीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातातील तलवार आणि तलवार धरलेला हात हवेमध्ये असेले. त्यामुळे त्यांच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.