breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“माणसाने लॅविश राहू नये का?” नितीन राऊत यांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

मुंबई – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घर आणि कार्यालयातील झगमगाटावरुन भाजपने ऊर्जामंत्र्यांवर आरोपांवर आरोप करत त्यांचा चांगलेच वेठीस धरले आहे. आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमुना पाहा, असं ट्वीट भाजपने केलं आहे.

मात्र या टिकेला ऊर्जामंत्री नितीन राऊत चांगलंच उत्तर दिल आहे. “मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?” असं नितीन राऊत म्हणाले.वाढीव वीज बिलानंतर भाजप आता वीज तोडणीवरुन आक्रमक झाली. भाजप महाराष्ट्र या अधिकृत पेजवरुन नितीन राऊत यांच्या घराचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोत नितीन राऊतांच्या घराच्या आत दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे.

https://www.facebook.com/BJP4Maharashtra/posts/3850730561639475

“आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना… हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं. या ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी !” अशी टीका भाजपने केली होती

भाजपच्या या टीकेला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिल आहे. राउत म्हणाले, “माझा जन्म गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?” अशा शब्दात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button