आता ‘स्मार्ट’ शॉपिंग करा, बिग बाझारचे नाव बदलले
![Shop 'smart' now, Big Bazaar renamed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/big-bazar.jpg)
मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेलकडून ’बिग बाजार’ आपल्या ताब्यात घेतले असून त्याचा एक भाग म्हणून रिलायन्स रिटेलकडून ’बिग बाजार’ असलेल्या ठिकाणी नवीन रिटेल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. या नवीन स्टोअरचे नाव ’स्मार्ट बाजार’ करणार आहे.
किशोर बियानी यांच्या कंपनीच्या रिटेल स्टोअर्सच्या संचालनाची जबाबदारी रिलायन्सने आपल्या हाती घेतली होती. त्यामुळे काही दिवस बिग बझारचे बहुतांशी स्टोअर्स बंद होते. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून रिलायन्स ट्रेंडस्, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजीटल आदी नवीन रिटेल स्टोअर चालवले जाणार आहेत. रिलायन्स रिटेलकडून 950 ठिकाणी आपले स्वत: नवीन स्टोअर सुरू करणार आहे. ही सर्व ठिकाणे रिलायन्सने फ्यूचर ग्रुपच्या नियंत्रणातून आपल्या नियंत्रणात घेतली आहेत. यातील 100 ठिकाणी कंपनी लवकरच ’स्मार्ट बाजार’नावाने स्टोअर्स सुरू होणार आहेत. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपने अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुपमध्ये 24 हजार 713 कोटींचा करार होऊन जवळपास वर्षाचा काळ लोटला होता.