कोरोना संसर्ग वाढल्याने मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा बंद
![Schools I to VIII in Mumbai closed again due to increased corona infection](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/school-students-1612059392.jpg)
मुंबई | कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील.मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.