’भाजपा-आपमध्ये साटेलोटे, संजय राऊतांचा थेट आरोप, ‘दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा…
!['Satelote in BJP-AAP, direct accusation of Sanjay Raut, 'You take Delhi and leave Gujarat to us...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Sanjay-Raut.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे अशी लोकांना शंका आहे, असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे अशी लोकांना शंका आहे, असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्ली महापालिकेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निकालानुसार दिल्ली महापालिकेवर आपने आपला झेंडा फडवला. परंतु, सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि आपमध्ये डील झाल्याचा आरोप केला. “देशभरात तीन महत्वाच्या निवडणूका झाल्या. काल दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाली. या दिल्ली महापालिका निवडणुकीत १५ वर्षांपासून असलेली भाजपा सत्ता आपने खेचून घेतली. बसपा एमआयएम यांची मतविभागणी झाली नसती. तर आपला चांगला प्रकारे निकाल घेता आला असता. पण तरीही जे निकाल दिल्लीत आपला मिळाले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. कारण १५ वर्षांची सत्ता भाजपाकडून खेचून घेणे सोपे काम नाही. दुसरा गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे असा संशय लोकांना येऊ लागला आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.