शिवजयंतीनिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव पूर्व येथे साहित्य संदर्शन
![Sahitya Sandarshan at Mumbai Marathi Library Naigaon East on the occasion of Shiva Jayanti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/0595dd9b-264a-4c49-95f9-5156a0da6aa9-1.jpg)
विपुल साहित्यधन भांडाराने ताठ कण्याच्या पिढ्या घडतील … प्रा. नितीन बानुगडे पाटील
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगाव पूर्वच्या वतीने पुण्यश्लोक, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त,त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यावरील निवडक ,वैशिष्ट्यपूर्ण ,दुर्मीळ साहित्याचे व लेखांचे संदर्शन संस्थेच्या, संदर्भ कक्षात दि. २४फेब्रुवारी २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे! या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवजयंतीच्यादिवशी इतिहास अभ्यासक प्रा .नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले! “अशा दुर्मीळ व ऎतिहासिक पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या निघणे गरजेचे आहे,असे प्रा. पाटील त्यांनी सांगितले, ग्रंथसंग्रहालय व प्रदर्शनावर त्यांनी लिखित प्रतिक्रिया दिली की, “अलिबाबाच्या गुहेत जाऊन तिथले धनभंडार बघून जी अवस्था काशीमची झाली असेल तशीच नेमकी अवस्था आज मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बघताना माझी झाली!
ही अफाट संपत्ती नव्या पिढीसाठी आपण उत्तमतेने जतन करता आहात यातूनच विचारांने विलक्षण श्रीमंत असणाऱ्या पिढ्या घडतील … पुस्तकांनी मस्तक सुधारतं…सुधारलेलं मस्तक कुणाचं आंधळं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीने कुणापुढे नतमस्तकही होत नाही!
ताठ कण्याची पिढी घडवताना समृद्धतेचा हा वारसा आपल्या सर्वांच्या व्यवस्थापनाने आणखी समृद्ध झाला तर सारं सर्वोत्तम ,सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च! ” या संदर्शन उद्घाटनास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ भालचंद्र मुणगेकर, विश्वस्त अरविंद तांबोळी, कार्याध्यक्ष शीतल करदेकर, प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे,कोषाध्यक्ष प्रदीप ओगले व जयवंत गोलतकर, संदर्भ सचिव उमा नाबर ,सचिव शिल्पा पितळे व उदय सावंत तसेच स्वप्निल लाखवडे, मकरंद केसरकर, विनायक परब, नायगाव शाखा कार्यवाह अमेय कोंडविलकर, काळाचौकी शाखा कार्यवाह अँड राजेश डुंबरे, आदिती लाखवडे, कुर्ला शाखेचे सुनील रानभरे ,मुलुंड विभागाचे महेश कवटकर, गोरेगाव विभागाचे श्री भावे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते हे संदर्शन सोमवार साप्ताहिक सुटी वगळता मंगळवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ७ व रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यत हे प्रदर्शन खुले राहणार आहे ! हे सर्वांसाठी मोफत असून सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथसंग्रहालयाचे वतीने करण्यात आले आहे!