जनमताचा कौल : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजपा!
![Public opinion: Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray against BJP in Andheri by-election!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-14-at-4.39.24-PM-780x470.jpeg)
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीसह भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. ऋतुजा लटकेंचा राजीनाम स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र, उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. आता आज (१४ ऑक्टोबर) अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, सोशल मीडियावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्याबाबत ‘महाईन्यूज’ ने जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आहे.