पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या झळा सुरूच
![Petrol-diesel will be cheaper by another seven rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Petrol-1-1-1.jpg)
मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या ग्राहकांना काल सलग दुसऱ्या दिवशी दिलासा मिळाला होता. त्यामुळे सर्वसामन्यांमध्ये जरा चांगलं वातावरण होतं. मात्र आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरांचा भडका उडाला. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५-३५ पैशांची वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोलसाठी प्रतिलिटर १०६.१९ रुपये आणि डिझेलसाठी प्रतिलिटर ९४.९२ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच मुंबईत आज पेट्रोल प्रतिलिटरमागे ३५ पैसे आणि डिझेल ३७ पैशांनी महागले, ज्यामुळे पेट्रोल ११२.११ रुपये आणि डिझेल १०२.८९ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
या महिन्यात केवळ १२ दिवसांत पेट्रोलचे दर ३.४८ पैशांनी महागले आहेत, तर डिझेल दरात ४.०४ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर असते. सध्या जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु उत्पादन मात्र कमी आहे. दरम्यान, जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होणे सामान्य बाब आहे. परंतु या सततच्या दरवाढीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.