ऑमिक्रोनचा शेअर बाजारला फटका; सेन्सेक्सची घसरण, गुंतवणूकदारांचे १० लाख कोटींचे नुकसान
![The stock market plunged, the Sensex plunged by a thousand points](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/shear.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
ओमायक्रोनचा संसर्ग वाढत असल्याने याचा परिणाम शेअर बाजारवरही झाला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सकाळी साडे दहा वाजता सेन्सेक्स निर्देशांकात तब्बल 1300 पेक्षा जास्त घसरण झाली. जवळपास अडीच टक्के इतकी ही घसरण आहे. यामुळे सेन्सेक्स ५५ हजार ६६२ अकांवर स्थिर झाला तर तर निफ्टीतही (Nifty) २.२५ टक्के घसरणीसह निर्देशांक १६ हजार ६०३ अंकांवर होता.
या घसरणीमुळे तब्बल दहा लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अवघ्या दहा मिनिटांत बाजार भांडवल १०.४७ लाख कोटींनी कमी झाल्याने गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला आहे. शुक्रवारी बाजार भांडवल हे २६४.०३ लाख कोटी रुपये इतकं होतं ते आता २५३.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
ओमायक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे युरोपीय देशात लॉकडाऊन लागत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा फटका बसत आहे. त्यातच आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने आशियाई बाजारही घसरलेलाच दिसला. तसेच, कच्च्या तेलाच्या बाजारातही घसरण दिसून येत ्सून सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्समध्ये चार टक्क्यांची घसरण झाली. दरमऱ्यान, टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी, एचडीएफसी बँक यांचट्यातही मोटी घसरण झाली. मात्र, सन फार्माचे शेअर्स वधारलेले होते.