TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल
![Notorious Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar admitted to JJ Hospital for treatment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/kaskar.jpg)
मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. कासकर सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर तुरुंगातील स्थानिक डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. डॉक्टरांच्या सूचनेनंतर त्याला शुक्रवारी सकाळी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले
रुग्णालयाकडून मात्र या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, कासकरने खासगी रुग्णालयात उपचाराची मागणी केली होती, पण नियमानुसार त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही कासकरच्या छातीत दुखू लागल्यामुळे जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.