ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई-ठाणे मेट्रोचे काम संथगतीने; तीन वर्षांत ३० टक्क्य़ांचाच पल्ला, ‘एमएमआरडीए’ला चिंता

मुंबई |  Mumbai-Thane Metro work slows down; MMRDA worries about 30 per cent in three yearsमुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रो ४ प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत सरासरी केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पाच टप्प्यांच्या या प्रकल्पातील तीन टप्प्यांतील कामे चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) चिंता वाढली आहे.

‘एमएमआरडीए’ने वडाळा ते घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. ही मार्गिका २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र कामाला गती नसल्याने ते नियोजित वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

३२.३२ कि.मी.च्या आणि १४ हजार ५४९ कोटी खर्चाच्या मेट्रो ४ च्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली. वडाळा ते अमर महल जंक्शन, गरोडिया नगर ते सुर्यानगर, गांधीनगर ते सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र ते माजिवडा आणि कापूरबावडी ते कासारवडवली अशा पाच टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मात्र चार महिन्यांपासून तीन टप्प्यांतील काम कंत्राटदाराने बंद केले आहे. या तीन टप्प्यांत केवळ १० ते १५ टक्के, तर उर्वरित दोन टप्प्यांचे ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रकल्पाचे तीन वर्षांत केवळ ३० टक्केच काम झाले आहे. महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी याला दुजोरा दिला.

गाडय़ांच्या बांधणीबाबत मेनंतर निर्णय

२३४ मेट्रो डब्यांचे कंत्राट रद्द झाले आहे. त्याचा या प्रकल्पाला फटका बसणार असून खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी मात्र ही शक्यता फेटाळली. काम पूर्ण होण्यास दोन वर्षे शिल्लक आहे. कारशेडचा प्रश्न मार्गी लागला आहे, मोघरपाडा येथे कारशेड उभारण्यात येईल. मात्र यासाठीही बराच वेळ आहे. त्यामुळे गाडय़ा उशिराच आणणे योग्य ठरेल. गाडय़ांची बांधणी करण्यासाठी नव्याने कंत्राट काढण्याची घाई न करता मेनंतर याबाबतचा निर्णय घेऊ असे श्रीनिवास म्हणाले.

डब्यांचे कंत्राट रद्द

अशातच मेट्रो ४ साठी २३४ मेट्रो डब्यांची बांधणी करणाऱ्या मे. बॉम्बार्डियर ट्रान्स्पोर्टेशन ऑफ इंडिया आणि मे. बॉम्बार्डियर ट्रान्स्पोर्टेशन, जर्मनी या कंत्राटदार कंपनीने कारशेडची जागा निश्चित नसल्याचे कारण देत डब्यांच्या बांधणीचे कंत्राट रद्द केले आहे. यामुळे ‘एमएमआरडीए’च्या अडचणी वाढल्या आहेत.

तीन टप्प्यांतील बंद असलेल्या कामांबाबत कंत्राटदारांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत त्यांनी काम सुरू केले नाही वा कामाची गती वाढवली नाही, तर एप्रिलमध्ये त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई कोणत्या स्वरूपाची असेल, हे त्यावेळीच स्पष्ट होईल. – एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button