breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Mumbai : बलात्कारप्रकरणी भाजपाच्या ‘या’ माजी आमदारावर गुन्हा; अटक होणार!

मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

राज्यात महिला अत्यारांविरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरच अत्याचाराचे गुन्हे दाखल होताना दिसत आहेत. भाईंदरमध्ये महिला नगरसेविकेवर बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर दाखल करण्यात आलाय. त्यामुळे नरेंद्र मेहता यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सध्या नरेंद्र मेहता यांच्याशी कोणाचाच संपर्क होत नसून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी संजय तरकर आणि माजी आमदार नरेंद्र मेहतांवर गुन्हा दाखल केलाय. नरेंद्र मेहतांनी बलात्कार केल्याचा आरोप करणारा नगरसेविकेचा व्हीडीओ व्हायरल झालाय. 

१९९९ पासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नगरसेविकेने केलाय. तसंच याबाबत वाच्यता न करण्याबाबत धमकावण्यात आल्याचा आरोप तिने केलाय. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही. दोघांनाही फरार घोषित करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button