breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर; या दिवशी होणार परीक्षा
मुंबई – MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कम्बाईन परीक्षा कधी घेतली जाणार असून, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
mpscमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दि. ९ एप्रिल, २०१९ रोजीच्या पत्रान्वये सूचना मिळाल्या होत्या.त्यानुसार, ही परीक्षा आयोगाने प्रसिध्दीपत्रक काढत पुढे ढकलली होती.
आता ही परीक्षा ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल.असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.