ताज्या घडामोडीमुंबई

मंत्रालयात एका व्यक्तीचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने वृद्धाचे प्राण वाचवले

मुंबई : मंत्रालयात एका व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. काम होत नसल्याने संतापलेल्या या व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून या व्यक्तीचे सुरुवातीला मनधरणीचे प्रयत्न केले गेले. पण संबंधित व्यक्ती ऐकून घेण्याच्या मनस्थीत नव्हती. आपलं काम होत नसल्याने या व्यक्तीने मंत्रालयाच्या थेट पाचव्या मजल्यावरुन खिडकीतून बाहेर पडत स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अग्निशामक दल आणि पोलिसांकडून या व्यक्तीला वाचवण्याचे प्रचंड प्रयत्न झाले.

परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाला समजवण्याचा प्रयत्न केला. या ज्येष्ठ नागरिकाला उतरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही संबंधित ज्येष्ठ व्यक्ती संतापलेला होता. त्याने पोलिसांच्या विनंतीचा विचार केला नाही. ही व्यक्ती पोलिसांसमोर आपली भूमिका मांडत राहिली. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने या व्यक्तीजवळ जात त्याचे प्राण वाचवण्याचं काम केलं.

वृद्धाला सुखरुप आतमध्ये नेलं
यावेळी पोलिसांनी वृद्धाला विनंती करत आपल्यासोबत बातचित करण्यासाठी व्यस्त केलं. तेवढ्यात अग्मिशामक दलाच्या जवानांची क्रेन पाचव्या मजल्यावर पोहोचली. यावेळी अग्मिशामक दलाच्या जवानांनी वृद्धाला विनंती करत आतल्या बाजूला नेलं. दरम्यान, संबंधित व्यक्ती खाली पडला तरी जाळीवर पडावा, याचेदेखील प्रयत्न करण्यात आले. जवळपास अर्धा ते एक तास याबाबतच्या घडामोडी घडल्या.

पोलीस आता या वृद्धाचं नेमकं म्हणणं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच संबंधित विभागास वृद्धाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाहन केलं जाईल. पण वृद्धाच्या टोकाचा निर्णयामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने कोणताही गैरप्रकार घडला नाही. प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे आपल्या कुटुंबासाठी आपला जीव जास्त आवश्यक आहे. त्यामुळे परिस्थितीला सामोरं जात लढा द्यायला हवा. अशाप्रकारे टोकाचा निर्णय कुणीही घेऊ नये, असं आवाहन वारंवार केलं जातं. याआधीदेखील अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. याच घटनांची दखल घेऊन मंत्रालयात जाळी बसवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button