TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो १ सेवा विस्कळीत ;दुरुस्तीनंतर ४० मिनिटांत वाहतूक पूर्ववत
![Metro 1 service disrupted due to technical glitch; service restored within 40 minutes after repair](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/metro-1.jpg)
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गावरील सेवा बुधवारी रात्री ८.२० ते ९ वाजता दरम्यान विस्कळीत झाली. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) अधिकाऱ्यांनी हा बिघाड दूर केला. मेट्रो १ च्या मार्गात रात्री ८.२० वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वर्सोवा ते एअरपोर्ट मेट्रो स्थानक सेवा बंद झाली. मात्र एअरपोर्ट मेट्रो स्थानक ते घाटकोपर दरम्यानची मेट्रो सेवा सुरळीत होती. मेट्रो सेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सुमारे ४० मिनिटे ही सेवा बंद होती. एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी बिघाड दूर केल्यानंतर रात्री ९ नंतर सेवा सुरळीत झाली.