ताज्या घडामोडीमुंबई

तीन वर्षांनी अखेर तरुणीला न्याय

प्रेम विवाह केल्याच्या रागातून लेकीची गळा चिरुन हत्या

संभाजीनगर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आई आणि भावाने मुलीच्या घरात घुसून कोयत्याने मुलीचा खून केला. ते एवढ्यावर थांबले नाही त्यांनी शीर धडावेगळे केले. राज्याला हादरवून टाकणारी घटना ५ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी आता आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या घटनेत किशोरी उर्फ कीर्ती अविनाश थोरे या तरुणीचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी शोभा संजय मोटे आणि संकेत संजय मोटे असे शिक्षा झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. शोभा मोटे हिस जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. कलम ४४९ खाली पाच वर्षे शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली. कलम ४५२ नुसार तीन वर्ष शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

तसंच मुलगा संकेत संजय मोटे यास जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास कलम ४४९ अन्वये पाच वर्ष शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, कलम ४५२ अन्वये तीन वर्ष शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय बाल गुन्हेगार कायद्यानुसार संकेत यास वयाच्या २१ वर्ष होईपर्यंत बाळ सुधारग्रहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायादीश एम मोहि्योद्दीन एम ए. यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला.

वीरगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी अविनाश संजय थोरे यांच्या तक्रारीवरून शोभा मोटे आणि संकेत मोटे यांच्या विरुद्ध खुनाचे प्रकरण दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, पोलीस नाईक किशोर आघाडे यांनी तपासकाम करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सुनावणीच्या वेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल बाळासाहेब महेर यांनी नऊ जणांच्या साक्षी नोंदवल्या. सरकार पक्षाने आरोप सिद्ध केल्याने न्यायालयाने आई आणि मुलाला शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सतीश गायकवाड आणि विठ्ठल जाधव यांनी सहकार्य केले.
भाग्यश्री सूडे हत्या प्रकरण; लातूरकरांचा तीव्र निषेध मोर्चा, सीबीआय चौकशी अन् तात्काळ फाशीची मागणी

काय होते प्रकरण?
वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील रहिवासी किशोरी उर्फ किर्ती (१९) हिने लाडगाव येथील अविनाश संजय थोरे (२२) यांच्याशी जून २०२१ मध्ये आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. या विवाहाला किशोरीच्या घरच्यांचा विरोध होता. किशोरीच्या काटा काढण्याचा कट तिची आई शोभा आणि भाऊ संकेत यांनी रचला. ५ डिसेंबर रोजी अविनाश आणि किशोरी हे नवदांपत्य लाडगाव शिवारात इट क्रमांक ३०७ मध्ये असतांना आरोपी शोभा आणि संकेत हे तिथे गेले.‌ किचनमध्ये शोभा हिने किशोरीचे पाय धरले आणि संकेत याने तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर बाहेर येऊन त्याने किशोरीचे शीर हातात घेऊन मोबाईलने सेल्फी काढला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button