Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Lockdown: कौतुकास्पद! तीन वर्षांच्या कबीरने कप केक विकून मुंबई पोलिसांना केली ५० हजारांची मदत

सध्या करोनाने सगळ्या जगाला ग्रासलं आहे. अशात पोलीस, डॉक्टर्स हे आपले करोना योद्धे ठरत आहेत. मुंबई पोलिसांना करोनाशी लढण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलाने कप केक विकून ५० हजारांची मदत केली आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ आणि ट्विट मुंबई पोलिसांनी ट्विट केलं आहे. तसंच या कबीरलाही त्यांनी करोना वॉरियरची उपमा दिली आहे.





