शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र
![Letter to the Prime Minister's Office against 'that' statement made by the Governor regarding Shivaji Maharaj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/a9344f07e50be55314a49b2bd42a5d821670563917180381_original-720x470.webp)
मुंबई । प्रतिनिधी।
उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर नवी दिल्लीतून खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष
उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे, शिवभक्त नाराज आहेत. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं योग्य नव्हे, या मुद्द्याकडे राजकीय नजरेतून पाहू नये अशी आशा आहे. पंतप्रधानां समोर सांगितल्यामुळे आशा आहे की प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री आहे.
पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे. – उदयनराजे
राज्यपालांच्या वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून राज्यपालांच्या वक्तव्याबाबत भाजप जबाबदार नाही. या संदर्भात 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं होतं. राष्ट्रपतींनी आधीच दखल घेतली आहे. आजही प्रक्रियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे, तसेच मोदींकडे आमची भूमिका पोहचली आहे, तसेच पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे. असं उदयनराजे म्हणाले.