breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नितेश राणे यांच्या जामिनावर उद्या फैसला

कणकवली | प्रतिनिधी 
शिवसेना कार्यकर्ते दिनेश परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले, भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जमीन अर्जावर उद्या न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जेल कि बेल हे उद्या दुपारी तीन वाजता कळेल. मात्र आज त्यांना घरी जाण्यास न्यायलयाने परवानगी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात शरण यायला सांगितले होते. त्यानुसार ते आज सत्र न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर विशेष सरकारी वकील घरत आणि बचाव पक्षाचे वकील सतीश मानेशिंदे व संग्राम देसाई यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी वकील घरत यांनी सांगितले कि नितेश राणे हे चुकीच्या पद्धतीने न्यायालयात शरण आले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अगोदर त्यांना कस्टडीत घ्यायला हवे. तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना येथून कुठेही जाण्याची परवानगी नसावी. कारण दिनेश परब हल्ला प्रकरणात प्रगती व्हावी म्हणून त्यांच्या कस्टडीची आवश्यकता आहे. कारण ते या कटात सहभागी होते आणि त्यांच्या सूचनेवरूनच परब यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे त्यांची अजून चौकशी होणे गरजेचे आहे

संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती आणि दीड लाख रुपये सुपारीची रक्कम ठरली होती . त्यातील २० हजार रुपये हल्लेखोरांना अडव्हांस म्हणून मिळाले होते. हल्लेखोर आणि नितेश राणे यांच्यात संपर्क होता असे आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे अजून चौकशी होणे गरजेचे आहे म्हणत घरत यांनी नितीश राणे यांच्या जामिनाला विरोध केला तर संग्राम देसाई यांनी सांगितले कि पोलिसांच्या म्हणण्यानुसार नितेश राणे यांच्याकडे ७ मोबायील नंबर आहेत. पण पोलिसांच्या अहवालात त्यांनी तीन मोबायील नंबर दिले आहेत त्यातील एक नंबर जो नितेश वापरात असल्याचा पोलीस दावा करीत आहेत तो नितेश्राने यांनी ७ वर्षांपूर्वीच वापरायचा बंद केलाय . नितेश राणे यांच्यावर ३५३ च्या तीन केसेस आहेत त्यात मालवण बांगडा फेक आंदोलन,डंपर आंदोलन आणि इंजिनियरच्या तोंडाला काळे फासणे या व्यतिरिक्त कोणतेही गुन्हे त्यांच्यावर नाहीत असे देसाई यांनी युक्तिवादात सांगितले. ज्या व्हान मध्ये कात रचला असे पोलीस सांगत आहेत ती व्हान भाजपने भाड्याने आणली होती . त्यामुळे ती ताब्यात घेण्याची आव्शाय्क्ता नाही या प्रकरणात नितेश राणे यांची यापूर्वी चौकशी झालेली आहे. मग आता कास्त्डीची गरज काय असा सवाल नितेश राणेंच्या वकिलाने उपस्थित केला तसेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांचे संरक्षण दिलेले आहे याचीही सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयास आठवण करून दिली न्यायालयाने सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद एकूण घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजता नितीश राणेंच्या जामिनावर निकाल दिला जाईल असे सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button