Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘छत्रपतींबद्दलचे ज्ञान अमित शाहांकडून घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही’; संजय राऊत

Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांची काल तिथीनुसार पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत, असे अमित शाह यांनी भाषणादरम्यान म्हटले. अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित शाहांच्या रायगड दौऱ्याबद्दल विचार करण्यात आली. त्यावर संजय राऊतांनी जबरदस्त टोला लगावला. अमित शाहांकडून छत्रपतींबद्दलचे ज्ञान घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा –  माऊलींचा 750 वा जन्मोत्सव भव्य होणार, मुख्यमंत्र्यांसोबत आळंदी संस्थानाची चर्चा

रायगडसारख्या जिल्ह्यात तुम्ही महायुती म्हणून एकोपा दाखवू शकला नाहीत. मी पाहिलं की एसंशि गटाचे लोक स्नेह भोजनाला नव्हते. छत्रपतींबद्दलचे ज्ञान अमित शाहांकडून घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. छत्रपती काय होते, त्यांचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती, महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वैगरे वैगरे.. ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाने सुडाने कारवाया केलेल्या आहेत, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि लोक माना डुलवणार, या राज्यावर अद्याप इतकी वाईट वेळ आलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button