TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’चे लोकार्पण; मुंबईत पहिल्या टप्प्यात ५१ दवाखाने सुरू

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार मिळावे या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ५१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार  राहुल शेवाळे, स्थानिक आमदार वर्षां गायकवाड, आमदार सुनिल शिंदे व राजहंस सिंह तसेच आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार आदी उपस्थिती होते.

धारावी येथे आयोजित एका समारंभात दृकश्राव्य प्रणालीचा वापर करुन ५१ ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आगामी सहा महिन्यात मुंबईत एकूण २२० बाळासाहेब ठाकरे दवाखाने निर्माण केले जाणार आहेत. यातील काही दवाखाने हे दवाखाने उपलब्ध असलेल्या मोकळय़ा जागेत पोर्टा केबिनमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत, तर काही दवाखाने हे सध्या उपलब्ध असलेल्या दवाखान्यांच्या जागेत सुरू करण्यात येणार आहेत.

सहा महिन्यांत १४९ दवाखाने

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गोमारे यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजने अंतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांना त्याच्या सोयीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यात १७ नोव्हेंबर २०२२ पासून ५१ दवाखाने सुरू करण्यात आले. पुढील सहा महिन्यांत २० पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह १४९ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येतील.

दवाखान्यांमध्ये काय?

या दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी तसेच १५० प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या शिवाय आवश्यकतेनुसार क्ष-किरण चाचणी (एक्स रे), सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या पालिकेने निश्चित केलेल्या वैद्यकीय चाचणी केंद्रांमधून करण्यात येणार आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button