breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
कर्मचाऱ्यांविरोधात अवमानाची नोटीस काढण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली, पण यावेळी कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, कोर्टानं महामंडळाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी निश्चित केली आहे. यावेळी कोर्टानं कर्मचाऱ्यांविरोधात अवमानाची नोटीस काढण्यास नकार दिला. त्यामुळं ही राज्य सरकारला चपराक असल्याचं मानलं जात आहे.
कोर्टानं एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी कोर्टाच्या आदेशाच्या अवमानाबाबतची माहिती सर्व २५० डेपोंमध्ये नोटीस लावून माहिती देण्याची सूचना केली. तसेच कोर्टाचे आदेशाची प्रतही लावण्याच्या सूचना केल्या. तसेच कोर्टाच्या आदेशाची प्रत मराठी-हिंदी वृत्तपत्रांमध्येही छापून आणण्याचे आदेश कोर्टानं राज्य शासनाला दिले.