TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई शहरात सोमवारी रात्री पावसाची पुन्हा दमदार हजेरी

मुंबई : मुंबई शहरात सोमवारी रात्री पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. तर, मुंबईत उपनगरांत तुरळक सरी बरसल्या. मुंबईतील काही भागात मंगळवारी सकाळीही पावसाचा मुक्काम होता. पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक उन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागात मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या. ५ मि.मी. ते १५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button