ताज्या घडामोडीमुंबई

गोविंदांची पंढरी म्हणून ठाणे शहराची ओळख

जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २१ लाखांचे पारितोषिक

ठाणे : गोविंदांची पंढरी म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. ठाण्यातील काही प्रमुख दहीहंडी प्रसिद्ध आहेत. त्यांचा नावावर विश्वविक्रम झाला आहे. या दहीहंडी उत्सवांमध्ये संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठानाचा उत्सव आणि परंपरा यांचा अनोखा संगम आहे. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. यंदाच्या दहीहंडी उत्सावाला लाडक्या बहीण योजनेची जोड दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे.

गोविंदा पथकावर बक्षिसांचा वर्षाव
‘संकल्प प्रतिष्ठान आयोजित “संकल्प दहीहंडी उत्सव २०२४” याचे यंदा १९ वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २१ लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. ठाणे शहरात सर्वप्रथम जे पथक पहिले नऊ थर लावेल त्या पथकास पथकास ११ लाखांचे बक्षीस देण्यात येईल आणि त्यानंतर ९ थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

महिला गोविंदांना विशेष मान
गोविंदांसह महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होतात. तसेच या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेले आहे. या भव्यदिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण ३ हंडीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल, तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानकडून २००६ सालापासून दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे केले जाते. यंदा येत्या २७ ऑगस्ट २०२४ रोजी रघुनाथ नगर येथे ही दहीहंडी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button