breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई
अभ्यासाला लागा! नीट परीक्षेची तारीख जाहीर
मुंबई – मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021′ (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.
NEET (UG) 2021 MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इंग्रजी हिंदीसह 11 भाषेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 1 ऑगस्टला ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
परीक्षा, अभ्यासक्रम व अर्ज भरण्याबाबत माहिती नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्जाबाबत लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी
-
- https://nta.ac.in , https://ntaneet.nic.in/Ntaneet/Welcome.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी.