breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! ठाण्यात पोस्टरबाजी
ठाणे | प्रतिनिधी
ठाण्यात शिवसैनिकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अशाप्रकारची बॅनरबाजी होत असल्याने खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर लावले आहेत. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर श्रीकांत शिंदे यांचा 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला. दोघा पिता-पुत्रांना बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे बॅनर लावल्याची माहिती समोर आली आहे.