breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन; वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास
![Former Congress MLA Madhukar Thakur passes away; He took his last breath on his birthday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Madhurk-Thakur.jpg)
मुंबई – अलिबाग उरण मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली.
मधुकर ठाकूर हे मागील तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.