Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण
मुंबई | प्रतिनिधी
कॉंग्रेसचे नेते तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन माहीती दिली आहे. कॅबिनेटची बैठक सुरू असताना ते अचानक या बैठकीतून बाहेर पडले होते. त्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. पण आता त्यांनीच ट्वीट करुन ही माहीती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्यावी.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्यावी.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 27, 2022
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 27, 2022
मागच्या दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती.