ठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात गोळीबाराची घटना; एक जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Fire.jpg)
ठाणे। महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात आज गोळीबाराची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेत एकजण जखमी झाली आहे. दोन गटांमधील संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. दोन गटांमधील वाद सोडवणाऱ्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याचे समजतेय. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्यावेळी त्याचे सहकारी देखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचं काम करत होते. यावेळी हल्लोखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु आहे.