ताज्या घडामोडीमुंबई
मध्य रेल्वेवर उद्या आठ तासांचा मेगाब्लॉक
![Eight-hour megablock on Central Railway tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/local-train-2.jpg)
मुंबई | विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, १३ मार्चला मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान दोन्ही जलद मार्गावर आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे लोकल उशिराने धावतील.
या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावरही मेगाब्लॉक आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर पनवेल दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.