राज्यभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साह
मुंबई |डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती आज, गुरुवारी मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्याची जय्यत तयारी ठिकठिकाणी सुरू आहे. राज्यभरात रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत व मोठ्या मैदानांतही महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यभरातील लाइव्ह अपडेट्स
यंदा मोठ्या संख्येने नागरिक चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी दिवसभर कामाची पाहणी सुरू होती. नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याची सुविधा, रुग्णवाहिका आदींची सोय पालिकेने केली आहे. चैत्यभूमीच्या परिसरात फुलांनी सजावट करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांसाठी दादर चौपाटीवर नव्याने उभारलेले माता रमाबाई आंबेडकर डेक हे नवे आकर्षण असेल. त्या भागातही पालिकेने सुशोभिकरण केले आहे