दहीहंडीला उपस्थित राहिलेल्या सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
मराठी माणसांनी आपली संस्कृती जपली पाहिजे : सोनाली कुलकर्णी
![Dahi Handi, Present, Sonali Kulkarni, Statement, Discussion, Marathi, Man, Culture,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/sonali-kulkarni-780x470.jpg)
मुंबईः काल सर्वत्र दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक ठिकाणी राजकिय पक्षाद्वारे मोठमोठ्या दहीहंडीचे आयोजन केलेले. तसेच बऱ्याच ठिकाणी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावून बाळगोपाळांचा उत्साह वाढवला. त्यातील मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडीला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाहुणी म्हणून गेलेली. त्यावेळी माध्यंमांशी संवाद साधताना तिने तिच्या मनातल्या दहीहंडी सणासाठीच्या भावना व्यक्त केल्या.
माध्यमांना मुलाखत देताना सोनालीने, मराठी माणसांनी आपली संस्कृती जपली पाहिजे असे मत व्यक्त केले. ती म्हणाली की, आपली संस्कृती टिकवायची असेल तर उत्सव अशाच पद्धतीने साजरे करायला हवेत. मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती जपली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचेल. दही हंडी उत्सवात मराठी माणसांना एकत्र पाहून खूप छान वाटतं, आनंद होतो.
या ठिकाणी अनेक मराठी सिनेमातले कलाकार येत असतात. आपल्या मुंबईत गोविंदाच्या निमित्ताने हक्काचं व्यासपीठ मराठी माणसांना मिळतं. आपल्याला कायम वाटतं मुंबईतून मराठी माणसं संपत चालली आहेत का? पण अशा वेळी म्हणजे गोपाळदादांसारखी माणसं मराठी माणसांना एकत्र आणतात तेव्हा कळतं, नाही….. दही हंडी हा आपल्या महाराष्ट्रातला मानाचा उत्सव आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात त्याच्या आठवणी आहेत. तो नेहमी मराठमोळ्या पद्धतीने साजरा होतो.
सोनालीने यावेळी सध्या सतत कानावर येणाऱ्या महिलांवरील अत्याचारांवरसुद्धा भाष्य केले. ती म्हणाली की, महिलांवरच्या अत्याचाराबाबत फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात सारखी परिस्थिती आहे. देशभरातले कायदे कठोर होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही राज्यात क्रांती घडणार नाही. प्रत्येक राज्यात बदल घडायला हवा असेल, देशात बदल घडवायचा असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया त्वरित व्हायला हवी. लोकांना कळत नाही की याची शिक्षा कठोर असू शकते तोपर्यंत याबाबतीत त्यांना गांभीर्य जाणवणार नाही. बदल वरुन घडत नाही तोपर्यंत परिणाम पाहण्यास मिळणार नाही.”