TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

अमेरिकेतून पोस्टाद्वारे गांजा मागवणाऱ्यास सीमाशुल्क विभागाकडून अटक

अमेरिकेतून पोस्टामार्फत गांजा मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने पुण्यातील २७ वर्षीय तरुणाला नुकतीच अटक केली. आरोपी व त्याच्या मित्राने परदेशातून गांजा मागवल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी ३९ ग्रॅम उच्च प्रतिचा गांजा जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सिद्धार्थ खुराना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतील परदेशी पोस्ट कार्यालयात सीमाशुल्क विभागाने अमेरिकेतून आलेली दोन पाकिटे अनुक्रमे १८ व २० ऑक्टोबरला जप्त केली होती. त्यात तपासणीत ३० ग्रॅम व ९ ग्रॅम उच्चप्रतिचा गांजा सापडला होता.

पुण्यातील सिद्धार्थ खुराना याच्या नावाने ते टपाल आले होते. सिद्धार्थला चौकशीसाठी सीमाशुल्क विभागाने बोलावले असता चौकशीत त्याने एका मित्रासह अमेरितील लॉस एन्जलिस येथून गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सीमाशुल्क विभागाने सिद्धार्थला अटक केली. आरोपीच्या चौकशीतून पेपलद्वारे त्यांनी या गांजाची रक्कम भरली होती.

Powered By
VDO.AI

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button