TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. दोन गटांत वाद निर्माण करणे, सामाजिक शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने विधान केल्याप्रकरणी प्रदीप भालेकर या ट्विटर हँडल वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांना या आक्षेपार्ह ट्वीटबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी तपासणी केल्यानंतर उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चंदनशिवे यांनी स्वत: याप्रकरणी समता नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार समता नगर पोलिसांनी भादंवि कलम १५३(अ)(दोन गटांत शत्रुत्व वाढवणे), १५३(ब) (चिथावणीखोर वक्तव्य करणे), ५०० (बदनामी करणे), ५०४ (प्रक्षोभक विधान करणे), ५०५(२) (सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, २३ ऑक्टोबरला प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीने केलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विविध आरोप केले होते. तसेच शिंदे व फडणवीस यांनी आपल्याला जिवे ठार मारण्याचा कट रचला आहे. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तीच्या हत्येबाबतही खळबळजनक विधान ट्वीटमध्ये करण्यात आले आहे. ते ट्वीट आक्षेपार्ह वाटल्यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार केली. याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button