Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महिला पत्रकार राणा अयुबला धमकावणाऱ्या ४ जणांवर गुन्हा
![Crime against 4 persons for threatening female journalist Rana Ayub](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Journalism.jpeg)
मुंबई | प्रतिनिधी
महिला पत्रकार राणा अयुबला सोशल मीडियावर बलात्कार आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ४ अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आहे.
‘माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवणारे आणि ट्विटमध्ये फेरफार करून मला ठार मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणार्याविरोधात मी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात ४ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे’, अशी माहिती राणा अयुबने केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे. सौदी अरबमध्ये राणा आयुबला बंदी घातल्याची खोटी बातमी या आरोपींनी पसरवली. याशिवाय तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आहे.