#CoronoVirus:APMC मार्केटमधील आणखी 6 जणांना कोरोना, आकडा 12 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG_20200429_082818.jpg)
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांच्या दिवस वाढ होत आहे. मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एपीएमसीमधील कोरोना रुग्णाची संख्या 12 वर आहे.
पहिल्यांदा एपीएमसी मार्केटमध्ये (27 एप्रिल) एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 28 एप्रिलला एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधित होणाऱ्या व्यापारी धान्य मार्केटच्या G विंगमध्ये व्यापार करत होता. हा व्यापारी कोपरखैरणेमधील रहिवासी आहे. याआधी L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याची संपर्कात आलेल्या 6 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.