breaking-newsमुंबई

#Coronolockdown:मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे. यामुळे नागरिकांना फक्त किराणा माल, दूध, भाजी, इतर अत्यावश्यक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ (अन्न-पाणी), औषधे यांची खरेदी करता येणार असून इतर वस्तू विकणाऱ्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात आल्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले होते. मात्र, या निर्देशात बदल करुन आता मुंबई महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

कारण, जीवरक्षक वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टीम यांच्या बिघाडानंतर त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक, हार्डवेअरची दुकाने बंद असल्यानं त्यात अडचणी येत आहेत. म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये तिथल्या सहाय्यक आयुक्तांना एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान खुले ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button