#CoronaVirus | सरकारनं कठोर निर्णय घेणं अत्यंत आवश्यक : राज ठाकरे
!["If Corona's crisis seems imminent, then the election has been postponed"; Raj Thackeray's attack on Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/raj-thakare.jpg)
मुंबई । जनता कर्फ्युदरम्यानही काही ठिकाणी जत्थेच्या जत्थे बाहेर पडल्याचं दिसलं. आज दुसऱ्या दिवशीही रस्त्यांवर मोठ्या संख्येनं वाहनं दिसत आहेत. लोकांना परिस्थितीचं भान दिसत नाही. त्यामुळं पुढील काळात सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील उद्धव ठाकरे सरकारचंही अभिनंदन केलं. थोडासा उशीर जरी झाला असला तरी, सरकारनं योग्य पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले.
डॉक्टरांवर ज्यांनी ज्यांनी हात उचलले असतील, त्यांना आता डॉक्टर किती महत्वाचे आहेत, याची जाणीव झाली असेल. सर्व धार्मिक स्थळे आज बंद आहेत. पण फक्त रुग्णालये सुरू आहेत. डॉक्टर, कर्मचारी आपल्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हा बंद निषेधार्थ नव्हता. तर एक टेस्ट केस होती. पण त्याचं गांभीर्य लोकांना समजलेलं नाही. लोकांनी अजूनही ऐकलं नाही, तर सरकारला यापेक्षा कठोर पावलं उचलावी लागतील.
जनता कर्फ्युच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसत होती. बाहेर पडू नका. उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलणं झालं आहे. त्यांना काही गोष्टी सूचवल्या आहेत. यावर काम सुरू आहे, असं त्यांनी मला सांगितलंय.