breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयातील ‘ते’ सर्व आरोग्य कर्मचारी कोरोनामुक्त

वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटीट रुग्णालयातील करोनाबाधीत झालेले सहाच्या सहा वैद्यकीय कर्मचारी करोनामुक्त झाले आहे. रविवारी ३ परिचारिका आणि एका वॉर्डबॉयला घरी सोडण्यात आले. तर दुसरीकडे शहरात रविवारी दोन नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या १५२ एवढी झाली आहे. वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटीट रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यात ५ परिचारिकांचा समावेश होता.

मागील आठवड्यात दोन परिचारिका करोनामुक्त झाल्या होता. तर आज उर्वरित ३ परिचारिका आणि १ वॉर्ड बॉय करोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. यामुळे पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान रविवारी नालासोपारा शहरात आणखी २ रुग्ण आढळले आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १५२ झाली आहे. त्यातील ६५ जण करोनामुक्त झाले असून ७७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button